इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये जय भवानी व्यायामशाळेच्या पूजा राजेश परदेशी हिने ६४ किलो वजनी गटात सिनियर्स मध्ये चुरशीच्या लढतीत ७६ किलो स्नॅच ९५ किलो क्लीन जर्क असे एकूण १७१ किलो वजन उचलून सुवर्णपदक व दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले
पूजा परदेशी ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थिनीची वनरक्षक पदी नियुक्ती
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य( स्वायत्त) महाविद्यालय, मनमाड...