loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

Jun 21, 2024


मनमाड – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता.त्यानंतर विश्व योग दिन साजरा करण्यात येऊ लागला
भाजपा मनमाड शहर मंडलाच्या वतीने भारतीय संस्कृती चा गौरव दिन म्हणून संबोधले जाणाऱ्या दहाव्या आंतर राष्ट्रीय योग दिना निमित्ताने शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी ठीक :- 8 – 30 वाजता पल्लवी मंगल कार्यालय मनमाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला
भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा जिल्हा जयकुमार फुलवाणी, भाजपा जिल्हा चिटणीस नारायण पवार भाजपा बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाच्या जिल्हा संयोजक तथा प्रख्यात योग प्राध्यापिका सौ.स्वाती प्रमोद मूळे भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे भाजपा मनमाड शहर सरचिटणीस आनंद काकडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते सर्व प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून या योग अभ्यास कार्यक्रम चा शुभारंभ झाला यावेळी योग प्राध्यापिका सौ स्वाती प्रमोद मुळे यांनी योगप्रार्थना, योग गीत सादर करीत योगशास्त्र व योग दिनाचे आणि योग व आरोग्य विज्ञान या विषयी अत्यंत अभ्यास पूर्ण आणि सोप्या भाषेत माहिती देत महत्व विषद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड सर यांनी केले आणि योग शास्त्रतील प्रमुख 10 आसनांचा प्राथमिक अभ्यास प्रात्यक्षिक सह मार्गदर्शन करून सौ मुळे यांनी उपस्थिततांन कडून करवून घेतला योग शिक्षिका सौ वर्षा गौरव मुळे आणि योग शिक्षक सार्थक महाले यांनी मार्गदर्शक योग आसन प्रात्यक्षिक मंचावर सादर केली यावेळी भाजपा च्या बेटी बचाव बेटी पढाव या
राष्ट्रीय कृत अभियाना अंतर्गत कु.श्रावणी विजय पुरंदरे कु.काव्या विवेक गुजराथी, कु.आराध्या स्वप्नील मोहरीर, कु.सोनाक्षी हेमंत जाधव कु.शर्वरी रोहित कुलकर्णी या शालेय विद्यार्थिनी स्त्री भ्रूण हत्या रोखणे साठी अभिनव पद्धतीने योग प्रात्यक्षिका द्वारे समाज प्रबोधनाचा संदेश दिला या कार्यक्रमास भाजपा कामगार आघाडी जि अध्यक्ष पंकज खताळ जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जलील अन्सारी भाजपा जिल्हा चिटणीस सौ अनिता इंगळे पवार,भाजपा दिव्यांग आघाडी चे दीपक पगारे,,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर ,कु अक्षदा पगारे, नाजमा अन्सारी,महिला मोर्चा च्या सौ जयश्री कुंभार,राजेंद्र गुप्ता, भाजपा व्यापारी प्रकोष्ठ चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी सौ सुचिता खताळ वेदिका मंडळा च्या सौ वैष्णवी पुरंदरे सौ मोहरीर,किरण उगलमूगले, राजेश वाघेला, कैलास देवरे, गुरुजीतसिंग कांत ऍड शशिकांत व्यवहारे मकरंद कुलकर्णी डॉ प्रताप गुजराथी, डॉ राठी स्वप्नील मोहरीर,मेंगाणे,रोहित कुलकर्णी आदी प्रमुख यांचे सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा चे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, आनंद काकडे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.