मनमाड – नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जय घोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती!’ छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे .उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. इयत्ता सातवी आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. इयत्ता दुसरी चा समर सानप इयत्ता सातवीची लावण्या पाटील,गार्गी संधानशिव,समर परदेशी यांनी आपल्या भाषणातून राजश्री छत्रपती शाहू महाराज त्यांच्याविषयी आपले विचार मांडले. 26 जून राजश्री शाहू महाराज यांची जयंती बहुजनांचा आधार, कर्तव्यदक्ष,आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना मानाचा मुजरा राजश्री शाहू महाराज हे विशाल मनाचे लोकराजा तसेच कोल्हापूर संस्थेचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 येथील घाटगे घराण्यात झाला. या विद्यार्थ्यांना प्रवीण आहेर,सौ तेजस्विनी चांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आराध्या सांगळे,अंतरा कोठावदे या विद्यार्थ्यांनी केले.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी. मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य,महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते.उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी....