loader image

संतोष गुप्ता यांच्यावर दाखल गुन्हे खोटे ; सीबीआय चौकशी करण्याची धात्रक यांची मागणी

Jun 29, 2024


मनमाड – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगाव तालुका प्रमुख संतोष आण्णा गुप्ता हे नांदगांव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असुन त्यांचे अनेक वर्षापासुन नांदगांव शहरात किराणा मालाचे दुकान आहे, सदरचा व्यवसाय करीत असतांना व त्यांचे बाबत कोणाचीही तक्रार नसतांना तसेच त्यांचेवर यापुर्वी राजकीय गुन्हे वगळता कोणतेही अमली पदार्थाचे व इतर कोणतेही गंभिर स्वरुपाचे गुन्हे नसतांना त्यांच्यावर दि. 24/06/2024 रोजी नांदगांव तालुक्यातील राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली येवून पोलीस यंत्रणेने कोणतीही शहानिशा व योग्य ती चौकशी न करता त्यांचे दुकानात गांजा सापडल्याचे सांगत खोटा गुन्हा दाखल केलेला आहे.

वास्तवीक दि. 23/06/2024 रोजी श्री. संतोष आण्णा गुप्ता यांचे दुकानात चोरी करण्याच्या किवा अन्य उद्देशाने त्यांचे दुकानाचे पत्रे उपडल्याचे त्यांचे निदर्शनास आले, त्यामुळे याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पोलीसांनी देखील घटनास्थळी भेट देवुन तपासणी केली. परंतु त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही केली नाही.

त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 24/06/2024 रोजी तहसिलदार व पोलीस यंत्रणेणे त्याचे दुकानात धाड टाकली व सदर ठिकाणी गांजा आढळुन आल्याचे सांगुन श्री. संतोष गुप्ता यांचेवर खोटा

गुन्हा दाखल केला. याचा अर्थ स्पष्ट होतो की, श्री. संतोष गुप्ता हे केवळ शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)

पक्षाचे नांदगांव तालुका प्रमुख असल्याने राजकीय आकसापोटी त्यांचे विरुध्द षडयंत्र रचुन शासकीय यंत्रणांचा चुकीचा नापर करुन त्यांना खोट्या गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यामध्ये अडकविणेत आले आहे. तसेच आम्ही गांजा बाळगण्याचा किंवा त्याचा वापर करण्याचे समर्थन करीत नसुन, आमचा हेतु व संतोष आण्णा गुप्ता हे अतिशय सच्चे न एकनिष्ठ कार्यकर्ते व ते खुप सभ्य व्यक्ती आहेत, त्यामुळे आमचा त्यांचेवर विश्वास आहे, आणि म्हणुणच आम्ही शासनाला व प्रशासनाला विविध निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की, सदर प्रकरणाची निपक्षपातीपणाने CBI, CID व SIT मार्फत सखोल चौकशी करणेत यावी जेणे करुन यातील मुख्य सुत्रधार व आरोपीचा उलगडा होईल, तसेच सदर चौकशीमुळे आमचे सहकारी संतोष आण्णा गुप्ता हे निर्देश आहेत हे सिध्द होईल.

तसेच आमचे सहकारी महाविकास आघाडीतील व विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच

विविध समाजसेवक व लोक हिताचे कामे करणाऱ्या व्यक्तींना “अब तेरा नंबर है” अश्या स्वरुपाच्या धमक्या नांदगांव तालुक्यातील सत्ताधारी व्यक्तींच्या लोकांकडुन येत आहेत. त्यामुळे सदरची गोष्ट ही खुप मोठी असुन याद्वारे समजते की सदरचा गुन्हा हा फक्त आणि फक्त राजकीय दबावापोटी बाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची CBI, CID व SIT मार्फत सखोल चौकशी न झाल्यास व श्री. संतोष
गुप्ता यांची सदर खोट्या गुन्ह्यातुन तात्काळ मुक्तता न केल्यास तसेच नांदगांव तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या धमक्या बंद न झाल्यास सदर अन्यायाविरुध्द नांदगांव तालुक्यातील सर्व पक्षियाच्या वतीने व नांदगांव विधानसभा मतदार संघातील तमाम्, जनतेच्या वतीने तिव्र स्वरुपाचे जेल भरो आंदोलन करण्यात येईल व त्यास सर्वस्वी शासन, पोलीस प्रशासन व ज्यांच्या दबावामुळे प्रशासनाने सदरचा खोटा गुन्हा दाखल केला आहे ते संयुक्तीकरित्या जबाबदार रहातील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी पत्रकान्वये दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.