loader image

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

Jul 4, 2024


विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदीनी समस्त देशवासियांच्या वतीनं भारतीय टीमचं अभिनंदन करत संवाद साधला.

टी-20 विश्वविजेता भारतीय संघ आज सकाळी नवी दिल्लीत दाखल झाला. वेस्ट बार्बाडोसमधील अंतिम सामन्यात द. आफ्रिकेला 7 धावांनी नमवून टीम इंडियाने विजय मिळवला. तेथील चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे टी-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला होता. यानंतर टीम इंडियाला विशेष विमानाने आज भारतात आणले. यानंतर आज सकाळी ११ वाजता टी-20 विश्वविजेत्या संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पीएम मोदींनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.

T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेर भारतात पोहोचला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विश्वविजेत्या संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ, सहाय्यक कर्मचारी, बीसीसीआयचे काही अधिकारी आणि खेळाडूंचे कुटुंबीय चक्रीवादळ बेरीलमुळे बार्बाडोसमध्ये अडकले होते.

नवी दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय संघ हॉटेल मौर्यमध्ये काही काळ आराम केला. यानंतर भारतीय संघ पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय संघासोबत सुमारे दोन तास चर्चा केली.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.