Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

Jul 6, 2024

नांदगाव : मारुती जगधने
तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक बिबट्याच्या दहशतीने भयभित झाले असुन या परिसरात बिबट्या मादीचे बछडे असल्याचा संशय वनविभाने वर्तविला.
नांदगाव तालुक्याला मोठा महादेव जंगलाला लागून पित्तळ खोरे असल्याने पाटणादेवी ४० गाव जंगलातील वन्यप्राणी नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागाला येत असतात या भागात बिबट्या,तरस,नीलगाय ,हरीण ,लांडगे आदी प्राणी वावरताना दिसतात सध्या नांदगाव तालुक्यात लोढरे शिवारात बिबट्या आढळून आल्याने बिबट्याच्या दहशतीने नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली असता वनविभागाचे तालुका परिक्षेञ अधिकारी एस. एस. ढोले यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल बिन्नर यांनी मौजे लोंढरे येथे अमोल सुभाष निकम यांचे गट नंबर 34/2 मध्ये बिबट्या वन्य प्राणी दिसल्याने ग्रामपंचायत लोढरे यांनी पिंजरा मागणी केली त्या नुसार सदर ठोकाणी पिंजरा लावून ग्रामस्थाना व शेतकऱ्यांना बिबट्या संरक्षणाबाबत जनजागृती केली.
दरम्यान लोढरे शिवारात बिबट्याच्या दहशतीने नागरीक सावधगिरी बाळगून असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येते.
लोढरे, नंतर चिंचविहीर येथे देखील बिबट्या असल्याचे स्थानिक नागरीक सांगतात सदर ठिकाणाची खाञी करुन वनविभागाने नागरिकांशी बिबट्याचा वावर या बाबत जनजागृती करावी.
लोढरे येथे दि १ जुलै दरम्यान नागरीकाना शेतात बिबट्या दिसल्याने नागरिकांच्या मागणी वरुन तेथे पिंजारा लावण्यात आला आहे . माञ पाच दिवसात बिबट्या पिंजर्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांची धाकधुक वाढली आहे.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]