loader image

नांदगांव बाजार समिती सभापती पदी सतीश बोरसे बिनविरोध

Jul 21, 2024


 

नांदगांव : मारुती जगधने साकोरा येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीश विनायक बोरसे हे संचालक मडळात सर्वात तरुण वय ३५ यांचे वर नांदगांव
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची जाबाबदारी देण्यात आली त्यांच्या निवडीचे संचालक मंडळाने व साकोरा येथील नागरीकानी जल्लोशात स्वाग:त केले.
.नांदगांव बाजार समितीचे सभापती अर्जुन यशवंत पाटील रा. जातेगांव यांनी ठरलेल्या आवर्तन पध्दतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर बाजार समितीच्या कार्य़ालयात सभापती पदाच्या निवडीसाठी नांदगांवचे सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी सतिष विनायक बोरसे रा. साकोरा यांचे एकच नाम निर्देशन पत्र दाखल झाल्याने , त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले. नामनिर्देशन पत्रावर संचालक जिवन गरूड यांनी सुचक, तर समाधान पाटील अनुमोदक म्हणून सही केली.

सभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवनेरी सभागृह. नांदगांव येथे बैठक होऊन संस्थेचे मार्गदर्शक तथा आमदार सुहास कांदे व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे प्रमुख उपस्थितीत सतिष बोरसे यांचे नावावर एकमत झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूकीवेळी माजी प.स.सभापती विलास आहेर, माजी जि.प. सदस्य रमेश बोरसे, माजी सभापती तेज कवडे, मजूर फेडरशेन संचालक प्रमोद भाबड, विष्णू निकम , नागापूर सरपंच राजेंद्र पवार, दिलीप इनामदार , किरण देवरे ,वाल्मीक जगताप , मावळते सभापती अर्जुन पाटील , उपसभापती दिपक मोरे, संचालक एकनाथ सदगीर, साहेबराव पगार, पोपट सानप, अनिल वाघ ,अनिल सोनवणे, अलकाताई कवडे, मंगला काकळीज, अमोल नावंदर, यज्ञेश कलंत्री,निलेश इपर, सचिव अमोल खैरनार यांचेसह बाळासाहेब कवडे, भाऊसाहेब काकळीज, यांच्या सह साकोरा गावातील ग्रा.पं. व सोसायटी पदाधिकारी, ग्रामस्थ कर्मचारी वर्ग, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सतिष बोरसे यांच्या निवडीचे आमदार सुहास कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी जि.प.सदस्य रमेश बोरसे, माजी सभापती तेज कवडे आदिंनी अभिनंदन केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.