Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

Jul 21, 2024

प्रतिनिधी मनमाड –
येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे यांनी भेट दिली .श्रीमती पांडे या मध्य रेल्वेच्या प्रथम महिला रेल प्रबंधक असून शाळेच्या व्यवस्थापना विषयी त्यांनी गौरवउद्गार
काढले श्रीमती पांडे यांनी मध्य रेल्वे शाळेचे निरीक्षण करून आवश्यक सूचना दिल्या .शाळा ही संस्काराचे केंद्र असून या बागेमधून भविष्यातले फुले आकार घेणार असतात .
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन द्वारे ही शाळा संचलित होत असून शहरातील शैक्षणिक प्रगती शाळेचा मुलाचा सहभाग असतो याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या श्रीमती ज्योती अंबादास निकम यांच्या हस्ते श्रीमती पांडे यांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला फुलाची रोपे देऊन सत्कार करण्यात येऊन डी आर ए मॅडम कडून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले मंडळ रेल प्रबंधक यांच्याकडून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी 25 हजार रुपये पारितोषिक स्वरूपात जाहीर करण्यात आल्याने व्यवस्थापनाने विशेष आभार व्यक्त केले .उपस्थित मंडळ रेल प्रबंधक महोदय यांच्या हस्ते शाळेतील मुलांना टिफिन बॉक्स व चॉकलेट देऊन मुलांसमवेत आनंद साजरा करण्यात आला. एकंदरीतच डीआरएम मॅडमच्या भेटीचे योग्य नियोजन, शालेय व्यवस्थापनाची उत्तम तयारी या जोरावर दौरा यशस्वी करण्यात सीआरडब्ल्यू डब्ल्यूओ मनमाड च्या अध्यक्षा भावना मुंगसे पाटील या यशस्वी झाल्या असे म्हणता येईल.सदर कार्यक्रम प्रसंगी मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन भुसावल येथील सचिव कास्यपी अग्रवाल, खजिनदार पुजा अर्पित सहसचिव सुधा राव, प्रशासकीय सदस्य स्मिता गरड या उपस्थित होत्या.
मनमाड येथील सर्वश्री तरुण दंडोतिया,राहुल अग्रवाल ,सचिन मुंगसे पाटील हे रेल्वे अधिकारी उपस्थित होते. शालेय प्रशाशना कडून आभार व्यक्त आले.मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]