Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

Jul 22, 2024

 

मनमाड : योगेश म्हस्के गुरूर ब्रम्हा..गुरूर विष्णु… गुरूर देव महेश्वरा..गुरूर साक्षात परब्रम्ह..तसमे श्री गुरुवे नमः..अर्थात गुरुच्या रुपातच ब्रम्हा -विष्णु-महेश यांचे स्वरूप आहे.आषाढ शुल्क पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस , महर्षी वेदव्यास पौर्णिमा म्हणुन देखिल गुरुपौर्णिमेचा दिवस ओळखला जातो.

माता-पिता आपलेे प्रथम गुरू असतात, त्यामुळेच मातृ-देवो-भव , पितृ-देवो-भव , आचार्य-देवो-भव असा उल्लेख आढळतो. अर्थात आई-वडील-गुरू देवा समान असतात.गुरू-शिष्य परंपरा तसेच गुरुकुल शिक्षण पद्धती याचे महत्व पुराणकाळात आढळते.भारतीय संस्कृतीत आणि परंपरेमध्ये गुरूंना आदराचे आणि उच्चस्थान दिलेले आहे.

मनमाड शहरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती-भावाने साजरा करण्यात आला. शहरातील श्री साईबाबा मंदिरामध्ये अभिषेक पुजन आणि महाआरती , श्री गजानन महाराज मंदिर येथे अभिषेक पुजा , होम-हवन आणि महाआरती , श्री स्वामी समर्थ केंद्र आणि मंदिर येथे अभिषेक पुजन ,आरती आणि महाप्रसाद , श्री दत्त मंदिर आणि परिसरातील वै.बालकदास महाराज , वै.ताहनजी बाबा देटके ,वै. सीताराम बाबाजी समाधी या सर्व मंदिरामध्ये सकाळी महाअभिषेक पुजा , सत्यनारायण पुजा ,आरती करण्यात आली. रायपुर येथील श्री संतधाम येथे संतांच्या समाधीचे पुजन करून , किर्तन आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. बुधलवाडी येथील श्री संत साळीबाबा यांच्या समाधी मंदिर येथे देखील गुरुपौर्णिमा निमित्ताने परिसरात दिंडी प्रदक्षिणा करून किर्तनाचे आयोजन करून आणि महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले.मनमाड गुप्तसर साहेब गुरुद्वारा मध्ये देखील गुरुपौर्णिमा निमित्ताने भजन ,किर्तन आणि लंगरचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमा निमित्ताने आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.तसेच संस्कार खेळवाडी शाळेमध्ये शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी केली.

सकाळ पासुन शहरातील भाविक-भक्त आणि नागरिक मोठया संख्येने गुरुपौर्णिमा निमित्ताने मंदिरांमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]