मनमाड – बुद्धवाडी भागातील कपिलवस्तू बुद्ध विहारात महामाया महिला मंडळाच्यावतीने आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून वर्षावास कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यावेळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाच्या वाचनाला प्रारंभ करण्यात आला.पुढील तीन महिने अर्थात अश्विन पोर्णिमेपर्यंत ग्रंथाचे वाचन सुरू राहील.
प्रारंभी बुद्ध वंदना घेण्यात आली. केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे,बौद्धाचार्य मच्छिद्रनाथ भोसले वर्षा शेजवळ , बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरुण अंकुश यांनी वर्षावास कार्यक्रमाचे महत्व विशद केले.यावेळी महामाया महिला मंडळाच्यावतीने खिरदान वाटप करण्यात आले.तर महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा आम्रपाली वाघ यांच्यावतीने उपस्थित महिलांना महामानवांच्या विचारांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
प्रकाश एळींजे, साहेबराव आहिरे, गणेश केदारे, अशोक गरुड ,अविनाश गरुड, गौतम केदारे ,निलेश वाघ यांच्यासह महामाया महिला मंडळाच्या कमलबाई हिरे, कमलाबाई एळींजे,निर्मलाबाई अंकुश,शालुबाई आहिरे, चित्राबाई अंकुश लताबाई हिरे, ताईबाई केदारे , चंद्रकलाबाई दि.एळींजे, अलकाबाई केदारे, चंद्रकलाबाई एळींजे,मिनाबाई वाघ,छायाबाई जमदाडे,सुमनबाई गरुड, रेखाबाई अंकुश ,चित्राबाई डांगळे,अश्विनी केदारे,दीक्षा अंकुश, भूमी अंकुश,प्राजक्ता एळींजे,तृप्ती केदारे,अनुष्का निरभवणे, वैष्णवी केदारे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भाजपा मनमाड शहर मंडल 10 व्या आंतर राष्ट्रीय योग दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मनमाड - मनमाड शहर भाजपा मंडलाचे वतीने 2015 पासून सलग 10 व्या वर्षी शुक्रवार दिनांक 21 जून 2024...