loader image
[ays_poll id=7]

नांदगाव विधानसभा मतदार संघातून माजी खा समीर भुजबळांनी उमेदवारी करावी – मागणी

Jul 23, 2024


 

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असून माजी खासदार समिर भुजबळ यांनी नांदगाव मतदार संघातून उमेदवारी करावी अशी मागणी नांदगाव येथील मेळाव्यात करण्यात आली. मेळाव्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. नांदगाव येथील सप्तश्रृंगी हाॅल मध्ये जनविश्वास सप्ताह निमित्त कार्यकर्ता मेळाव्यात ही मागणी करण्यात आली.दि २१ रोजी राञी उशीरा पर्यंत ही बैठक सुरू होती. बैठकीला माजी खासदर समीर भुजबळ व जिल्हा प्रमुख अॅड रवींद्र पगार, विजय पाटील व अन्य प्रमुखांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितानी नांदगाव विधानसभेला माजी खा समीर भुजबळ यांना उमेदवारी द्यावी या मागणी ची आपण वरिष्ट्रांकडे मागणी करु असे मत अॅड पगार व माजी खा भुजबळ यांनी मेळाव्यात सांगीतले.
दरम्यान
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष / माजी खासदार समीर भुजबळ हे दि २१ रोजी नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यांचे मनमाड संपर्क कार्यालयात आगमन होताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, मनमाड बाजार समितीचे सभापती तथा शहराध्यक्ष दिपक गोगड, महिला शहराध्यक्ष अपर्णाताई देशमुख, प्रकाश बोधक, योगेश जाधव, डॉली निकाळे,
हबीब शेख, शुभम आहेर, अक्षय देशमुख, जावेद शेख, आनंद बोथरा, दीपाली कोरडे, फिरोज शहा, सुफियांन मिर्झा, समाधान त्रिभुवन, राजू पवार, शफी शेख, सलमान शेख यांच्यासह संचालक मंडळ आदी मनमाड बैठकीत पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनविश्वास सप्ताह साजरा करणे संदर्भात मेळाव्या प्रसंगी नांदगाव नगरीत समीर भुजबळ यांच्या आगमना नंतर मेळावा संपन्न झाल्यानंतर नांदगाव सारनाथ बुद्ध विहार मध्ये त्यांनी भेट दिली त्याप्रसंगी भगवान गौतम बुद्धांना पुष्पहार अर्पण करताना समीर भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गौतम जगताप ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अरुण साळवे विलास कोतकर ,अनिल जाधव, विनोद शेलार, राजू लाठे, तानसेन जगताप, आदी उपस्थितीत होते या वेळी भुजबळ यांचे सारनाथ बौध्दविहार मध्ये स्वागत करण्यात आले .

वरिष्टांचा आदेश आला तर निर्णय घेऊ , तुमची सर्वांची मागणी वरिष्ठांना कळवितो,असा विश्वास भुजबळ ,व पगार यांनी व्यक्त केला.यावेळी विजय पाटील,देवदत्त सोनवने,प्रसाद सोनवने,विनोद शेलार,दिपक गोगड,तालुकाध्यक्ष अर्पणाताई देशमुख
योगिता पाटील चंद्रकलाबाई बोरसे अलकाबाई आयनॉर
शहराध्यक्ष सीमा राजोळे
,वाल्मीक टिळेकर, भगवान मोरे, योगेश बोरसे,बाळासाहेब महाजन,अरुण पाटील,प्रताप गरुड,पवार, ,राजेंद्र लाठे,राजोळे,पवार,गणेश पाटील,देहाडराय,,सुधाकर निकम,अशोक पाटील,सोमनाथ पाटील,दत्तु पवार, नारायन पवार, आदी सह शेकडो कर्याकर्ते उपस्थित होते..

नांदगांव शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मागील पंचवार्षीकला माजी आमदार पंकज भजबळ यांचा सुमारे १२ हजार मतानी पराभव केला हा पराभव भुजळांच्या जिव्हारी लागला असून
आता आमदार कांदे यांचे विरोधात माजी खासदर समिर भुजबळ यांनी उमेदवारी करावी अशी मागणी असंख्य कार्यकत्यांनी लाऊन धरली असून या दृष्टीने राष्ट्रवादीकडुन पावले टाकली जातात की काय?
तसेच ठाकरे सेनेचे गणेश धाञक ,काँग्रेसचे माजी आमदार अनिलकुमार आहेर ,माजी आमदार पंकज भुजबळ पैकी कोणाची उमेदवारी नांदगाव विधानसभेला होते हे वेळ ठरवेल .
दरम्यान दिंडोरी मतदार संघात माजी खा.भारतीताई पवार यांचा परभव झाला असल्याने विरोधीपक्षाचे
पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह व्दिगुणी झाला असून यातुन आता राष्ट्रवादीकडुन भुजबळांची उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे .
या दरम्यान उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांचा वाढदिवस आणी राष्ट्रवादी पक्षाने राज्यात केलेली कामे व राज्यसरकार यांनी केलेली विकासात्मक कामे जनतेपर्यांत पोहचवावी या संदर्भात विश्वास व्यक्त करण्यात आला .


अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.