नांदगांव : मारुती जगधने
१३६ वर्षा पासून नांदगांव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे या प्रसंगी सलग सात दिवस अखंड हरिनामाचा सप्ताह गाथा पारायन व श्री शिवमहापुराण कथामृत व भव्य कीर्तन सोहळा आयोजीत करण्यात आला दि २८ जुलै रोजी संत सावता महाराज उत्सवाला प्रारंभ झाला असून दि ४ आॅगस्ट २४ रोजी श्रावण प्रारंभी सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने समारोप होईल या उत्सवास ज्येष्ठ नागरीक तथा सामाजिक कार्यकर्ते विष्णु निकम यांनी अध्यक्ष स्थान भुषविले सप्ताहात आमदार सुहास कांदे,अनिल करवा,प्रकाश पाटील,सुनंदा पाटील,माजी आमदार अनिल आहेर,माजी आमदार संजय पवार,डाॅ रोहन बोरसे,तहसीलदार अनिकेत निकम,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,माजी नगराध्यक्ष श्रिनिवास कलंञी,रमेश बोरसे,माजी सभापती सुभाष कुटे,राहुल परदेशी,संजय महाजन,शांतीलाल श्रीश्रीमाळ,अॅड सचिन साळवे,अन्ना बागोरे,संजय पवार,हरी गायकवाड,संदीप जेजुरकर, मारुती जगधने, खंडेराव खैरनार,पोपट सुरसे,वसंत खैरनार,सुरेश पवार,बाळासाहेब महाजन,शंकरराव पवार,सुपडु वाघ,रंजना सकट, गिरीराज निकम,सतीश जाधव,सोपान मोकळ,रवींद्र देशमुख ,पदमाकर दुसाने आदीसह नामवंत यजमान या प्रसंगी पुजनास उपस्थित होते. या सप्ताह प्रसंगी महिला प्रभात फेरी,सजावट,स्वच्छता,पालखी,पाहुण्यांचे स्वागत, देखरेख समिती आदींची नियुक्ती केली आहे.
संत सावता माळी उत्सव महाराष्ट्रातल्या शेतकरी समाजात साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे.संत सावता माळी हे शेतकरी वर्गातल्या देवतेचे एक रूप आहे, ज्याचे मुख्यत्वे करून शेतकरी,माळकरी,कीर्तनकार माळी, हभप पूजन करतात.उत्सव सणाच्या निमित्ताने शेतकरी आपल्या शेतातील पिकांची पूजा करून चांगल्या उत्पन्नासाठी प्रार्थना करतात. या उत्सवाच्या वेळी विविध धार्मिक विधी, कीर्तन, भजन, आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजातील एकोपा वाढावा आणि निसर्गाशी जोडलेली आपली परंपरा जपावी यासाठी हा सण उत्सव साजरा केला जातो.
संत सावता माळी हे महाराष्ट्रातील एक थोर संत होऊन गेले. त्यांचा जन्म इ.स. 1250 सुमारास माळी समाजात झाला. ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते आणि त्यांनी आपल्या कीर्तन व भक्तिगीतांद्वारे वारकरी परंपरेला महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रारंभिक जीवन
संत सावता माळी यांचा जन्म वाई तालुक्यातील अरणगाव येथे झाला. त्यांचे मूळ नाव सावता होते आणि माळी हे त्यांचे आडनाव होते. बालपणापासूनच त्यांना अध्यात्मिक विषयांची आवड होती आणि त्यांनी शेतात काम करता करता भगवंताचे स्मरण करणे सुरू केले.
आध्यात्मिक कार्य
संत सावता माळी हे शेतकरी होते आणि त्यांनी आपल्या शेताच्या कामातूनच भगवंताची उपासना केली. त्यांची भक्ती साधी आणि सरळ होती, ज्यात त्यांनी आपल्या कामातच ईश्वराची पूजा केली. त्यांच्या अभंगांमध्ये आणि कीर्तनांमध्ये त्यांनी पंढरपुर चे भगवान विठोबाचे महत्त्व वर्णिले आहे.
संदेश
संत सावता माळी यांचा मुख्य संदेश होता की, श्रम हीच पूजा आहे. त्यांनी त्यांच्या शेतकामातूनच ईश्वराला जाणण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या कीर्तनांतून आणि अभंगांतून त्यांनी शेतकऱ्यांना आणि समाजातील इतरांना परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले.
निधन
संत सावता माळी यांचे निधन इ.स. 1295 सुमारास झाले. त्यांच्या कार्यामुळे ते आजही महाराष्ट्रातील संत परंपरेत एक विशेष स्थान धरून आहेत. त्यांच्या उपदेशांमुळे आणि त्यांच्या जीवनाच्या उदाहरणामुळे अनेक लोक आजही प्रेरित होतात.नांदगांव येथे १३६ वर्षाची परंपरा जपत या वर्षात ही या उत्सवाचे आयोजन सावता उत्सव समितीने केले आहे यात देवाची आळंदी येथील नामवंत कीर्तनकार ह भ प प्रसाद गडदे,ह भ प रविंद्रसिंग राजपुत,हभप एकनाथ चत्तरशास्ञी,हभप युवराज देशमुख,हभप कन्हैय्या राजपुत,हभप ज्ञानेश्वर कदम,हभप उल्हास सुर्यवंशी,हभप उमेश दशरथे,आदींचे राञी ९ ते ११ नियमित कीर्तन सात दिवस व काल्याचे कीर्तन दि ४ रोजी सकाळी ९ ते ११ वा व महाप्रसाद सांगता, दरम्यान शहरातुन दिंडी सोहळा होईल,
या दरम्यान सलग सात दिवस. कथा वाचक सुश्री रामप्रिया माई अमरावती यांचे नियमित कथा वाचन हे सर्व धार्मीक सोहळा संतशिरोमणी सावता महाराज मंदिर येथे होणार या कार्यक्रमाला संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती नांदगांव यांनी या धार्मीक कार्याचा भाविकानी लाभ घ्यावा असे असे आवाहन करण्यात आले .
या ठिकाणी महिला पुरुष यांना बसण्याची स्वतंञ व्यवस्ता केली असून नाशिक,छ.संभाजी नगर,जळगांव,अहमदनगर,धुळे,नाशिक या जिल्ह्यातुन भाविक उपस्थित राहतात.
रोज पहाटे ४ ते ६ वा काकडा भजन ,८ ते १२ गाथा पारायन, सायंकाळी६ ते ७ हरीपाठ,
दुपारी २:३० ते ६ वा.पर्यंत शिवमहापुराण कथामृत,व रोज राञो ९ ते ११ कर्तन असे नियमित कार्यक्रम या सप्ताहात होतील.