loader image

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

Aug 11, 2024


कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा आम्रपाली निलेश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही कार्यकारणी निवडण्यात आली. कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष -आम्रपाली वाघ, चित्राबाई अंकुश, खजिनदार – चंद्रकलाबाई एळींजे,सेक्रेटरी -ताईबाई केदारे कामिनीबाई केदारे, संगीताबाई जाधव, कार्याध्यक्ष – कमलाबाई हिरे, कमलबाई एळींजे, निर्मलाबाई अंकुश,ऑडीटर – चंद्रकला दि. एळींजे,सुमनबाई गरुड, लताबाई हिरे, सदस्य – मिनाबाई वाघ, अनिताबाई केदारे, मंदाबाई जाधव,संजीवनी गरुड , जिजाबाई गांगुर्डे,शालुबाई भोसले ,शालूबाई आहिरे, पद्माबाई शेजवळ,अंजनाबाई अंकुश ,सरुबाई आहिरे,वैशाली वाघ,सुनीता वानखेडे ,वर्षा शेजवळ,वैशाली आहिरे,भारती केदारे, वंदनाबाई अंकुश, मायाबाई जाधव, यांची निवड करण्यात आली.
यावेळी बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरुण अंकुश ,केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे, बौद्धाचार्य मच्छिद्रनाथ भोसले, प्रकाश एळींजे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तीन महिने वर्षावास व वर्षावास कार्यक्रमाचा सांगता सोहळा उत्साहात साजरा करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.