Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन

Aug 14, 2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या रॅलीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. हर घर तिरंगा’ अभियानात, 9 ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ च्या दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, सहकारी संस्था, आणि शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने केली जाणे अपेक्षित आहे. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. भारतीच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ रॅलीच्या माध्यमातून लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला व स्वतःमध्ये तसेच आपल्या युवा पिढीमध्ये देश प्रेम, सांस्कृतिक मूल्ये यांना वाव मिळावे असा हेतू होता. या रॅलीचे शुभारंभ उपप्राचार्य डॉ बी एस देसले, पर्यवेक्षक डी व्ही सोनवणे, कुलसचिव समाधान केदारे,लेफ्टनंट प्रा प्रकाश बर्डे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ पवनसिंग परदेशी, प्रा.सोमनाथ पावडे, प्रा. कविता काखंडकी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ही रॅली मनमाड शहरातील महाविद्यालय- विवेकानंद नगर- जय भोलेनाथ मंदिर परिसर- गणपती मंदिर परिसर या भागात आयोजित करण्यात आली. या रॅलीचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS )व राष्ट्रीय छात्र सेना(NCC) यांच्या माध्यमातून करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]