अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज
नाशिक, १५ ऑगस्ट – आशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सने भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक, डॉ. सुशील पारख, डॉ हितेंद्र महाजन, डॉ बाबुलाल अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समारंभात केंद्र प्रमुख श्री. अनूप त्रिपाठी, सर्व विभागप्रमुख, डॉक्टर्स आणि स्टाफ उपस्थित होते.या सोबतच हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या व देशसेवा केलेल्या माजी सैनिकांचा व कुटुंबीयांचा सत्कार व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या विशेष दिवशी, आशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने फक्त ₹१९४८ मध्ये फ्रिडम आरोग्य पॅकेजची घोषणा या विशेष प्रसंगी करण्यात आली. या फ्रिडम आरोग्य पॅकेजमध्ये ५० हून अधिक आवश्यक तपासण्या समाविष्ट आहेत यासोबत हृदयतज्ञ, सामान्य चिकित्सक आणि आहारतज्ञ यांचा वैद्यकीय सल्ला व मार्गदशन समाविष्ठ आहे. जेणेकरून रुग्णांचे संपूर्ण आरोग्य मूल्यांकन करता येईल.
डॉ. सुशील पारख यांनी या प्रसंगी सांगितले कि, “या फ्रिडम १९४८ आरोग्य पॅकेजचा उद्देश म्हणजे समुदायाच्या आरोग्य सेवा अधिक सुलभ बनवणे आणि प्रत्येकाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.”
श्री. अनूप त्रिपाठी यांनी आरोग्यसेवकांचे आभार व्यक्त करतांना म्हणाले कि , नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा पुरवठा करण्यासाठी हॉस्पिटलच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.