loader image

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

Aug 15, 2024


मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे सदस्य मोहम्मद आमीन भाई गाजीयानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी साहेब, सेक्रेटरी हज्जन सायरा बानो सलीम अहमद,सदस्य श्री. अब्दुल करीम गाजीयानी,श्री. अफजलभाई गाजीयानी, तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात शाळेतील शिक्षिकांनी रांगोळीची लक्षवेधी सजावट केली होती.

ध्वजारोहणा नंतर स्वातंत्र्य दिनावर सांस्कृतीक कार्यक्रमात लेझीम पथकाने देशभक्ती गीतावर नृत्य सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच उर्दू व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी पिरॅमिड (मनोरा), रिंग झेंडी , डंबेल्स व स्काऊट गाईड, MCC च्या विद्यार्थ्यांचे परेड संचालन घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर,शेख आरीफ कासम,वरिष्ठ लिपीक शेख अशफाक अहमद व शेख अखलाक अहमद यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची देशभक्तीपर समुह गीत, नृत्य तसेच देशभक्तीपर भाषण सादर केले.संस्थेच्या सचिव सायरा मोहम्मद सलीम गाजीयानी यांनी शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थीनींचे, मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची प्रशंसा केली व उपस्थित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व विषद करुन शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये इ.१० वी व १२ वी परीक्षेत पहिले तीन गुणवंत विद्यार्थ्यांना व जिल्हास्तरीय फुटबॉल (U19) स्पर्धेत निवड झालेल्या संघातील विद्यार्थ्यांना व प्रशिक्षक शेख आरीफ कासम सर यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व मेडल देऊन गौरविण्यात आले.तसेच संस्थेचे सचिव हज्जन सायरा मो. सलीम गाजियानी, सदस्य आयशा मो. सलीम गाजियानी, समिना फैसल गाजियानी यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्ष रोपण करण्यात आले.

कार्यक्रमानंतर मनमाड एज्युकेशन सोसायटी तर्फे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीटांचे पाकीटे देण्यात आले. शाळेचे उपशिक्षक श्री. जगताप सर, शेख रब्बानी सर, सैय्यद अफरोजोद्दीन उपशिक्षिका शेख तहेजीब आरीफ, सौ. सविता सचिन कराड यांनी सुत्रसंचालन केले होते.

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.