loader image

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

Aug 20, 2024


बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत
जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत स्पृहणीय यश संपादन केले आहे
६४ किलो वजनी गटात पूजा राजेश परदेशी हिने ८२ किलो स्नॅच व १०१ किलो क्लीन जर्क असे १८३ किलो वजन उचलून सीनियर मुलींमध्ये चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकावले
८१ किलो वजनी गटात आनंदी विनोद सांगळे हिने ८० किलो स्नॅच ९४ किलो क्लीन जर्क १७४ किलो वजनी उचलून यूथ मध्ये सुवर्णपदक व ज्युनियर मुलींमध्ये रौप्यपदक पटकावले
दिव्या उपेंद्र सोनवणे हिने ४० किलो वजनी गटात ४५ किलो स्नॅच ५२ किलो क्लीन जर्क ९७ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले
४५ किलो वजनी गटात विनाताई संतोष आहेर हिने ६१ किलो स्नॅच ७८ किलो क्लीन जर्क १३९ किलो वजन उचलून ज्युनियर मुलींमध्ये रौप्यपदक
४९ किलो वजनी गटात मेघा संतोष आहेर हिने ६१ किलो स्नॅच ८१ किलो क्लीन जर्क १४२ किलो वजन उचलून ज्युनियर मुलींमध्ये रौप्यपदक
वैष्णवी आतिश शुक्ला हिने ४९ किलो यूथ मध्ये ५३ किलो स्नॅच ६२ किलो क्लीन जर्क ११५ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले
करुणा रमेश गाढे श्रावणी विजय पुरंदरे पूर्वा दिपक मौर्य श्रेया वाल्मीक सोनार यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.