Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

Aug 23, 2024

नांदगाव, दि.23 ऑगस्ट 2024
नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या तीन संघांची टेबल टेनिस स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झाली आहे.क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयला नाशिक मार्फत आयोजित जिल्हा पातळीवरील टेबल टेनिस स्पर्धा नाशिक जिमखाना नाशिक येथे आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेत जे. टी. कासलीवाल इंग्लिश मेडीयम स्कूल नांदगाव या शाळेच्या चौदा वर्षाखालील, सतरा वर्षाखालील व एकोणीस वर्षाखालील टेबल टेनिस खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
14 वर्षाखालील मुले विजयी, 17 वर्षाखालील मुले विजयी व मुली उपविजयी तसेच 19 वर्षाखालील मुली विजयी व मुले उपविजयी झाले. सर्व विजेत्या संघाची विभागीय पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. अशोक बागुल सर, श्री,राहुल त्रिभुवन सौ.प्रियंका खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन श्री. सुनिलकुमार कासलीवाल, खजिनदार श्री. विजुभाऊ चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशिलकुमार कासलीवाल, श्री. जुगलकिशोर अग्रवाल,रिखबचंद कासलीवाल महेंद्र चांदीवाल, प्राचार्य श्री मनी चावला सर मुख्याध्यापक श्री शरद पवार सर तसेच श्री. सावंत सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजेत्या व उपविजेत्या खेळाडू मुलामुलींचे खुप कौतुक व अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]