मुंबई येथे २४ ते २८ दरम्यान सुरू असलेल्या ऑल इंडिया इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू व सध्या मध्य रेल्वे मुंबई येथे सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुकुंद संतोष आहेर याने ५५ किलो वजनी गटात ११३ किलो स्नॅच १३६ किलो क्लीन जर्क १४९ किलो वजन उचलून लागोपाठ दुसऱ्या वर्षी इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकावले असून नगरोटा हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची भारतीय रेल्वे च्या संघात निवड निश्चित समजली जात आहे
मुकुंद ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे मध्य रेल्वे चे प्रशिक्षक अभिलाश क्रिस्टोफर राजेश कामथे यांचे मार्गदर्शन लाभले आहे

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.
मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...