loader image

नाशिक जिल्ह्यात सुरक्षित वाहतूक अभियानाला सुरवात

Aug 30, 2024


नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने नाशिक जिल्यात राबवला जाणार वाहतूक सुरक्षा सप्ताह
फोटो कॅम्पशन : पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी , सहायक पोलिस आयुक्त सुधाकर सुरडकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे , डॉ शेखर चिरमाडे , डॉ चेतन बीजवाल , डॉ अजय हिरक्कानीवर, केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी, मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे.
प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी नाशिक वाहतूक पोलीस व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरवात करण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश नाशिकच्या नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची जनजागृती करणे आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणे आहे.
या उद्घाटन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून पोलिस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी, आणि सहायक पोलिस आयुक्त श्री सुधाकर सुरडकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे उपस्थित होते.
या प्रसंगी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबवणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले, तसेच या मोहिमेद्वारे, आम्ही अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतुक अभियानाची मोलाची मदत होईल. हे अभियान नाशिकला अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे,” असे प्रतिपादन त्यांनी उपस्थित पत्रकार परिषेदत केले.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख यांनीही हॉस्पिटलच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. “अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिकच्या नागरिकांसाठी आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी कायम तत्पर आहे. आम्हाला विश्वास आहे की आरोग्य आणि सुरक्षितता एकमेकांच्या हातात हात घालून चालतात, आणि हे अभियान आमच्या जिल्ह्याच्या एकूण सुरक्षिततेत योगदान देण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे,” असे डॉ पारख म्हणाले.
सुरक्षित वाहतूक मोहिमेअंतर्गत जनजागृती मोहीम, कार्यशाळा आणि वाहनचालक आणि पादचाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासारख्या विविध उपक्रमांचा यात समावेश असेल. नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल एकत्रितपणे या अभियानाच्या माध्यमातून सुरक्षित ड्रायव्हिंगचा संदेश जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कार्य करतील.
या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी , सहायक पोलिस आयुक्त सुधाकर सुरडकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे , डॉ शेखर चिरमाडे , डॉ चेतन बीजवाल , डॉ अजय हिरक्कानीवर, केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी, मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे यांच्या सह डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.