loader image

के आर टी शाळेत शिक्षक दिन आणि चक्रधर स्वामी जयंती साजरी

Sep 6, 2024


येथील कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन व चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते. या कार्यक्रमास प्राचार्य श्री. मुकेश मिसर, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे आणि विश्वस्त श्री. धनंजय निंभोरकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त इयत्ता ८ वीची श्रुती काकड हिने चक्रधर स्वामीविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून शाळेतील प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या सह सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील विद्यार्थिनी कु.सई झाल्टे व कु. अस्मी झाडे यांनी केले.
इयत्ता १० वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १ ली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षक बनून शिक्षकाची भुमिका पार पाडली.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.