मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर शाळेच्या माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, माननीय पर्यवेक्षक श्री.अनिल निकाळे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. पारखे मॅडम व माजी शिक्षक केशव आचारे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन , श्री चक्रधर स्वामी आणि मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शालेय गायक वृंदाने ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमारी कावेरी वाबळे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमार तुषार काळे याने केले. कुमारी श्रद्धा आल्हाट, कस्तुरी धात्रक यांनी अनुक्रमे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व मदर तेरेसा यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती आपल्या भाषणात दिली. तर वैभव वडक्ते याने इंग्रजीतून केलेल्या भाषणातून शिक्षकांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या मा.मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असणारे योगदान स्पष्ट करून समस्त शिक्षकांना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. श्री सुनील कुमार कटारे यांनी श्री. चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याची माहिती आपल्या भाषणातून दिली. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेने देखील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. या दिवशी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळा चालवली. मुख्याध्यापक म्हणून आर्यन जोगदंड तर उपमुख्याध्यापिका म्हणून कीर्ती दराडे या विद्यार्थ्यांनी आपली भूमिका चोख बजावली. इतर विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर भूमिका अनुभवल्यात.

राशी भविष्य : २३ सप्टेंबर २०२५ – मंगळवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...