loader image

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

Sep 10, 2024


 

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 15 वर्षातील महिला संघाची निवड चाचणी नुकतीच पार पाडण्यात आली.
ज्यामध्ये मनमाड मधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा संघाच्या खेळाडुंच्या यादित निवड झाली तसेच गुरज्योत कौर मंगत हिची रिझर्व खेळाडु म्हणुन निवड झाली.

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हे सामने पुणे येथे सप्टेंबर महिन्यात खेळवले जाणार असुन आपल्या मनमाडच्या ह्या नवोदित खेळाडु महाराष्ट्र संघात निवड होण्यासाठी आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहेत.
मनमाडच्या या नवोदित महिला खेळाडुंकडुन चांगली कामगीरि होऊन त्यांची 15 वर्षातील महाराष्ट्र राज्य संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिल्या जात आहे. मनमाड शहराचे नंदुरबार जिल्ह्यासंघात प्रतिनिधित्व करण्यासाठी या खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड येथे कसुन सरावही करत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री. युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले.

या निवडीसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदेजी व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, अंकित पगारे , हबीब शेख , सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वांना लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले व पुढिल निवड सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
.