भारतीय जनता पार्टी ,शहर, देवळालीकॅम्प. ता.जि.नाशिक.तर्फे शिक्षक दिन दि.५ सप्टेंबर २०२४ निमित्ताने शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक या शाळेचे कलाशिक्षक श्री.देव हिरे यांना ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार-२०२४’ ने सन्मानित करण्यात आले. आज भाटगाव विद्यालयात विद्यार्थ्यांसमोर शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.का.ना.सारूकते सर यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी सर्व जेष्ठ शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेचे मा.मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारिवृंद यांचे आभार! तसेच,,,
भारतीय जनता पार्टी,शहर,देवळाली कॅम्प.ता.जि.नाशिक.चे अध्यक्ष या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजक श्री.जीवन चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थीत होते.