loader image

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

Sep 11, 2024


मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील राष्ट्रीय सेवा योजना मधील स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे च्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ आयोजित के एस के डब्लू कॉलेज, सिडको नाशिक येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत व SRD/NRD जिल्हास्तरीय निवड शिबिरात यश संपादन केले.
हिंदी वकृत्व स्पर्धा या प्रकारात ‘अस्मिता कवडे’ हिचा प्रथम क्रमांक, पोस्टर मेकिंग स्पर्धेत’ चंदा मनोज राम ‘ हिचा प्रथम क्रमांक तर इंग्रजी निबंध लेखन स्पर्धा या प्रकारात ‘ शुभांगी दिलीप शिंदे’ हिचे द्वितीय क्रमांक तसेच ‘ कुणाल सुदाम ठोंबरे’ याने SRD/NRD जिल्हास्तरीय निवड शिबिरात यश संपादन केले.
सर्व विजेत्या स्पर्धकांचे दि. २४ सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ आयोजित विद्यापीठस्तरीय साहित्यीक व सांस्कृतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच नूतन देवरे, तेजल पानसरे, सुफियान शेख व हेमलता गायकवाड यांनीही या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
महाविद्यालयाचे नाव जिल्हा स्तरावर गाजवणाऱ्या या गुणी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांत हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व हिरे ,डॉ. अद्वय हिरे-पाटील, विश्वस्त व जनसंपर्क प्रमुख मा. संपदा हिरे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हरिष आडके, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, विश्वस्त डॉ. बी एस जगदाळे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य प्रा. डॉ बी एस देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी व्ही सोनवणे , कुलसचिव श्री. समाधान केदारे, तसेच सर्व महाविद्यालयीन परिवाराने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पवनसिंग परदेशी, प्रा. सोमनाथ पावडे व प्रा.कविता काखंडकी यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.