loader image

श्री गुरु गोबिंद सिंग हायस्कुल मधील खेळाडुंची लेदर बाॅल जिल्हा संघात चमकदार कामगिरी

Sep 12, 2024

मनमाड येथील श्री गुरु गोबिंद सिंग हायस्कुलमधील 15 वर्षाआतील महिला क्रिकेट खेळाडु सुहानी बोरा , भाविका कौरानी , लविशा दौलानी यांची महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेत नंदुरबार अंडर 15 क्रिकेट संघासाठी निवड झाली तसेच गुरज्योत कौर मंगत या खेळाडुची राखीव खेळाडु म्हणुन निवड झाली. या खेळाडु पुणे येथे होणार्या स्पर्धेत मनमाडचे प्रतिनिधित्व नंदुरबार जिल्हा संघात करत आहेत. त्यासोबतच 14 वर्षाआतील खेळाडु गौरव निते याचीही नाशिक जिल्ह्यासंघात संभावित खेळाडुच्यां यादीत निवड झाली आहे.

गुरुद्वारा प्रमुख जथेदार
बाबा रणजित सिंगजी यांच्या विशेष सहकार्याने या खेळाडुंच्या सरावासाठी लागणाऱ्या सर्व सोयी शाळेच्या परिसरात उपलब्ध करुन दिल्या आहेत तसेच शाळेचे प्रशासक सुखदेव सिंग यांचे हि महिला संघाच्या सरावासाठी विशेष प्रयत्न खेळाडुंसाठी आहे. या खेळाडुंना क्रिकेट मधील मार्गदर्शन सिध्दार्थ रोकडे सर करत आहेत.

गुरुगोबिंद सिंग हायस्कूलचे संस्थाचालक व शाळेचे मुख्याध्यापक एस.एस. सुतार सर , मुख्यशिक्षिका चारुशिला पगारे मॅडम तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी या खेळाडुंचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.