मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA) नाशिक यांच्या सहकार्याने एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्या तथा उपशिक्षिका आयशा मो. सलीम गाजीयानी यांनी भूषविले. यावेळी इ. 9 वी ते 12 वी वर्गातील सर्व विदयार्थी,विदयार्थीनी तसेच त्यांचे पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.नाशिक येथील कर्करोग तज्ञ डॉक्टर, मेडिकल अंकोलॉजिस्ट सुदर्शन पंडीत व डॉक्टर श्रुती पाटे यांनी कर्करोगाची लक्षणे व कर्करोगापासून आपण बचाव कसा करू शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विदयार्थ्यांच्या विविध प्रश्नाचे निराकरण केले.तसेच लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड तर्फे मागील आठवड्यात झालेल्या शिक्षक दिनानिमित्त एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज चे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक शेवाळे भुषण दशरथ, संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर,शेख आरिफ कासम, उपशिक्षक शानूल सुभाष जगताप,यांनी लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी चे अध्यक्ष डॉ. निलेश राठी,सचिव डॉ.जालिंदर इंगळे,खजिनदार भारत जगताप,प्रकल्प संयोजक डॉ. प्रताप गुजराथी,डॉ.अर्चना राठी,सुशिल संकलेचा,विवेक बरडीया,डॉ. पवनसिंग परदेश,दत्तात्रय सूर्यवंशी, संजय मुथा,गणेश हडपे, नितीन पवार, चंद्रकांत मेंगाणे, अवधूत ननावरे, सुनिता डगळे,पंकज खताळ, सुचिता खताळ या सर्वांचे आभार आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक शेख रब्बानी आशिकअली,अनिस लाल खान, उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले होते.