मनमाड जवळील अंकाई शिवारातील वसंत नगर तांडा ( अनकाई) जवळील शिवाजी गरुड यांच्या घराजवळ आज पुन्हा पहाटे 3 वाजून 39 मिनिटाला बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील महिन्यात ही याच ठिकाणी बिबट्याचे वावर असल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमात आले होते व त्यापूर्वी मनमाड चे गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे सर आणि सहकाऱ्यांना ही मनमाड च्या बाजूने बिबट्याचे दर्शन झाले होते. अनकाई तसेच वसंतनगर भागातील व परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे व रात्रीच्या वेळेस मनमाड वरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....