loader image

बघा व्हिडिओ-मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

Sep 12, 2024


मनमाड:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष निकम व उपप्राचार्य डॉ बी एस देसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.डी.व्ही सोनवणे व कुलसचिव श्री समाधान केदारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.मुलींच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशीलता आणि जनजागृती करण्यासाठी तसेच मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे मिळावे यासाठी कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरात क्रीडा शिक्षक श्री. डी.पी.त्रिभुवन व त्यांच्या सोबत आलेल्या पूर्वी राजगुरू, इशिता चव्हाण, देवकी डोखे, स्नेहल बंद्रे या कराटेपटूंची ज्युडो कराटे तायक्वांदो, सिकाई मार्शल आर्ट,किक बॉक्सिंग यासारख्या कराटे प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवून, मुलींनी आत्मसंरक्षणासाठी याचा वापर कसा करावा त्यासंदर्भातले मार्गदर्शन केले. या प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना महिला सबलीकरणसाठी असे उपक्रम स्तुत्य असतात असे सांगितले. यावेळी कराटे पटूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.पी. बी.परदेशी तर आभार प्रा. सोमनाथ पावडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी लेफ्टनंट प्रा. प्रकाश बर्डे, प्रा विजया सोनवणे तसेच रासेयो स्वयंसेवीका, विद्यार्थीनी, एनसीसी कॅडेट उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना, यांच्यातर्फे करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.