loader image

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

Sep 14, 2024


राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू असे आरक्षण व दलित /आदिवासी विरोधी वक्तव्य केले तसेच शरद पवार यांचे उपस्थिती मध्ये ज्ञानेश महाराव यांनी विश्वा तील हिंदू चे आराध्य दैवत प्रभू श्रीराम चंद्र तसेच महान श्री दत्त अवतारी संत श्री स्वामी समर्थ व वारकरी संप्रदाय याचे विरोधात अपमानस्पद व वादग्रस्त विधान केले या दोन्ही घटना चा तीव्र निषेध करणे साठी मनमाड शहर भाजपा च्या वतीने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार निवडणूक प्रमुख पंकज खताळ भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांचे नेतृत्वा मध्ये एकात्मता चौक मनमाड येथे जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राहुल गांधी व शरद पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या ला चपले व पायानी तुडवण्यात आले व भारत माता की जय, वंदे मातरम, सिया वर रामचंद्र की जय,”काँग्रेस हटाव देश बचाव ” राहुल गांधी, शरद पवार मुर्दाबाद,अश्या घोषणा नी परिसर दुमदूमला राहुल गांधी दुसऱ्या देशात जावून आपले देशाची बदनामी करतात आरक्षण ला विरोध करणाऱ्या काँग्रेस नेच महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वास घात करून निवडणुकीत दोनदा पराभव केला भाजपा चे सरकार असे पर्यत कोणत्याही आरक्षण ला धक्का लागणार नाही असे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले या आंदोलनात भाजपा जिल्हा चिटणीस एकनाथ बोडखे,जिल्हा चिटणीस नितीन परदेशी,सौ अनिता इंगळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेध मिसर, भाजपा शहर उपाध्यक्ष गजू कासार अमित सोनवणे भाजपा कोषाध्यक्ष केतन देवरे भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे, भाजपा मन की बात प्रमुख दीपक पगारे गोविंद सानप,भाजपा मनमाड शहर सरचिटणीस आनंद काकडे भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत आदी प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यां सह भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलना चे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, सुमेर मिसर यांनी केले तर मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शना मध्ये यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने  हत्याकांड –  पत्नी,मेहुणी,साडू,  सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
.