नांदगांव : सहकारातील निवडनुका ह्या बिनविरोध होण्याची परंपरा आपण कायम राखीत असून हि निवडनुक देखील बिनविरोध होण्यासाठी सर्वांचे योगदान असून हि परंपरा कायम राहवी यासाठी आपण सदैव प्रयत्न करु या तसेच सहकारातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा
असे मत ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी व्यक्त केले ते देना लक्ष्मी कृषक सहकारी पत संस्थेच्या चेअरमन निवडी प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते .
देना लक्ष्मी कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित.नांदगांव जि. नाशिक या संस्थेच्या चेअरमन पदी संचालक किसनराव जगधने यांनी बिनविरोध निवड झाली .विठ्ठल दादा आहेर यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्या नंतर या जागेवर जगधने यांची निवड झाली या निवडी प्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, युवकांचे अशा स्थान विष्णु निकम ,माजी सभापती सुधीर देशमुख,हरेश्वर सुर्वे,
विठ्ठल आहेर ,उप चेअरमन इंदुबाई बोरसे, कारभारी काकळीज,गोगुळ रोंदळ,दौलत काकळीज,माणीक मोरे,उमाकांत थेटे,शेषराव घुगे,निवृत्ती बागुल,विश्वनाथ सानप,प्रमिलाबाई विठ्ठल काकळीज आदी संचालकांनी नविन चेअरमन निवडीचे स्वागत केले,