मनमाड : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अंतर्गत एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती च्या घोषणा, गायन व घोषवाक्य व्दारे मतदारांना मतदानाचे महत्व पटवुन दिले. सदर रॅलीमध्ये शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर रॅलीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री.शेवाळे भुषण दशरथ व संस्था संचालिका आयशा गाजीयानी मॅडम यांनी केले होते.