loader image

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे “नर्सिंग स्किलथॉन 2024” कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

Oct 5, 2024

नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सतर्फे नाशिक येथे “नर्सिंग स्किलथॉन 2024” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा उद्देश नर्सिंग व्यावसायिकांचे कौशल्य वाढवणे, सुरक्षित इन्फ्युजन पद्धती आणि सिम्युलेशन तंत्रांद्वारे कार्यक्षमता वाढवणे हा होता. या कार्यक्रमात नर्सिंग विद्यार्थ्यांना तसेच अनुभवी नर्सिंग व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले गेले, ज्याचा उद्देश उच्च दर्जाच्या रुग्णसेवेत सतत प्रगती साधणे हा होता.

उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कार्यशाळेचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, एचसीजी मानवता हॉस्पिटल, नाईनस प्लस हॉस्पिटल्स, एस आर वी हॉस्पिटल, भोसला इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, गणपतराव आडके इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, सिंधुताई विखे पाटील नर्सिंग कॉलेज, शताब्दी हॉस्पिटल, साई केअर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि अशोका सिसीए यांचे नर्सिंग विभाग प्रमुख , नर्स आणि ब्रदर मोठया उत्साहाने सहभागी झाले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे मेडिकल डायरेक्टर, डॉ. सुशील पारख यांच्या हस्ते झाले. केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी या प्रसंगी सहभागींना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉ. भाविक शाह, डॉ. राकेश पाटील, आणि डॉ. परेश अलवाणी यांनी नर्सिंग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रे तसेच सुरक्षित इन्फ्युजन प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती दिली, ज्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यात मदत होईल.

कार्यशाळेचे आयोजन मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. किशोर टिळे, नर्सिंग हेड किसन ढोली, नर्स एज्युकेटर चिप्पी राजमोहन, आणि इन्फेक्शन कंट्रोल नर्स निखिल केदार यांच्या नेतृत्वात करण्यात आले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन शक्य झाले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.