Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

Oct 17, 2024

 

नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन शासकीय आरोग्य योजनांचा शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यात मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. सुशील पारख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या योजनांतर्गत गरजू रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातील.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे हृदयरोग तज्ञ डॉ. सुधीर शेतकर, डॉ. कांचन भंबारे, डॉ. गिरीश बच्छाव, हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अजय हिरक्कनीवर, बाल हृदयरोग तज्ञ डॉ. संतोष वाडीले आणि मूत्रविकार तज्ञ डॉ. श्याम तलरेजा उपस्थित होते.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांचा लाभ पिवळी, केशरी, अंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे घेऊ शकतात. या योजनांद्वारे पात्र लाभार्थ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येईल.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

या योजने विषयी अधिक माहितीसाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, इंदिरा नगर, वडाळा रोड, नाशिक येथे भेट द्या किंवा ०४० ६८३३ ४४५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]