जळगाव येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा मधुकर शिंदे याने 19 वर्षातील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होत चौथा क्रमांक मिळवला नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या चार जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश होता
कृष्णा ची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या संघात निवड करण्यात आली आहे
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेला कृष्णा छत्रे विद्यालयाच्या इतिहासातील तसेच मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील पहिलाच बुद्धिबळपटू ठरला आहे वंजारवाडी सारख्या ग्रामीण भागातून दररोज सायकलवर शाळेत ये जा करणाऱ्या कृष्णाने अतिशय जिद्दीने व मेहनतीने यश संपादन केले आहे
विजयी खेळाडूस छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे हरीश चंद्रात्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका पोतदार एस एस यांनी यशस्वी खेळाडूच अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.
मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...