loader image

नांदगाव बाजार समिती मध्ये मक्याची विक्रमी आवक

Oct 23, 2024


नांदगांव ( ) – नांदगांव बाजार समिती मध्ये मका शेतमालाची आवक गेल्या आठवड्यापासून दिवसेंदिवस वाढत असून आज रोजी नांदगांव यार्डवर बुधवार रोजी ७५०० क्विंटल आवक झाली असून २ हजार ७४९ सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
नांदगांव तालुक्यासह चाळीसगांव , वैजापूर , कन्नड या तालुक्यातून नांदगांव बाजार समितीचे नांदगांव , बोलठाण व न्यायडोंगरी यार्डवर मोठ्या प्रमाणात मका आवक येत आहे. परंतू परतीच्या पावसाने सध्या नांदगांव तालुक्यात थैमान घातल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याच परिस्थीती मध्ये दिवाळी सण तोंडावर आल्याने शेतकरी वर्ग बाजार समिती मध्ये मका शेतमाल विक्री करणेसाठी आणत असून बाजार समितीच्या कार्यालय परिसरातच शेतमाल विक्रीचे पेमेंट रोख स्वरूपात अदा केले जात असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. पावसाचे वातावरणामुळे गेल्या दोन दिवसापासून बोलठाण व न्यायडोंगरी यार्डवरील लिलावाचे कामकाज व्यापारी वर्गाच्या विनंतीवरून बंद होते . तसेच नांदगांव यार्डवर मोठ्या प्रमाणात आवक येत असून वाळलेला मका या शेंतमालास कमीतकमी २००० ते २७४९ असा बाजारभाव मिळाला असून सरासरी बाजारभाव २३५० रूपये मिळाला आहे. तसेच पावसाचे वातावरण असल्याने काही प्रमाणात ओली मका विक्रीस येत आहे. त्यामुळे ओल्या मकाला बाजारभाव १४०० ते १७०० असा बाजारभाव मिळाला आहे.
शेतकरी बांधवांना शेतमाल विक्री नंतर रोख स्वरूपात पेमेंट कार्यालय परिसरातच केले जात असून यासाठी नव्याने व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र कॅबिन नांदगांव व बोलठाण यार्डवर उभारण्यात आल्या असून शेतकरी वर्गाने नांदगांव , बोलठाण व न्यायडोंगरी या नांदगांव बाजार समितीच्या यार्डवर मका विक्रीस आणावा असे आवाहन नांदगांव बाजार समितीचे सभापती सतिष बोरसे यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.