loader image
[ays_poll id=7]

७ महिन्याच्या बाळावर यशस्वी हृदय जीवनदायिनी शस्त्रक्रिया

Oct 24, 2024


 

नाशिक, २३ ऑक्टोबर : अशोका मेडिकव्हर हास्पिटल येथे ७ महिन्याच्या बाळावर नुकतीच “बलून एऑर्टिक वाल्वोटोमी” ही तातडीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली, ज्यामध्ये दुर्बिणीच्या साहाय्याने हृदयाचा वाल्व उघडण्यात आला. मेडिकल डायरेक्टर डॉ.सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली बाल हृदय विकार तज्ञ डॉ संतोष वाडीले यांच्या टीमने सक्षमपणे हाताळली हि गुंतागुंतीची अवघड केस हे हॉस्पिटलच्या वैद्यकीय कौशल्याचे आणि प्रगतीचे मोठे उदाहरण ठरले आहे.

तात्काळ उपचारासाठी बाळाला धुळे येथून नाशिकच्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. सात महिन्याच्या बाळाला गेले दोन-तीन महिने सतत खोकला, श्वास घेताना त्रास, आणि दूध पिण्यात अडचण येणे यांसारखी लक्षणे जाणवत होती. त्याचबरोबर बाळाच्या अत्याधिक चिडचिडेपणामुळे त्याच्या पालकांनी बालरोगतज्ञांचा सल्ला घेतला. दोन २डी इको चाचण्या केल्यानंतर, हृदयावर उच्च रक्तदाब असून हृदयातील सर्वात मुख्य वाहिनीतील वाल्व ब्लॉक किंवा शरीराच्या मुख्य रक्तवाहिनीत अडथळा असल्याचे निदान झाले. नाशिक येथे पुन्हा तपासणीनंतर बाळावर ” बलून एऑर्टिक वाल्वोटोमी ” ही तातडीची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामध्ये दुर्बिणीच्या सहाय्याने वाल्व उघडण्यात आला. ही शस्त्रक्रिया बाल हृदय विकार तज्ञ डॉ. संतोष वाडिले आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण केली.

या यशावर डॉ. सुशील पारख म्हणाले कि, पूर्वी लहान मुलांचा हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी मुंबई ,पुणे यासारख्या मोठया महानगरात रुग्णाला जावे लागत असे, त्यामुळे काळाची गरज लक्षात घेऊन आमच्या हॉस्पिटल मध्ये लहान मुलांचा स्वतंत्र “हृदयरोग विभाग” डॉ संतोष वाडीले यांच्या नेतृत्वात सुरु केला आहे. या विभागामध्ये हृदय विकार तज्ञ , हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ , लहान मुलांचे अतिदक्षता विभागातील तज्ञ , चौवीस तास उपलब्ध आहेत. तसेच याच तज्ज्ञांच्या देखरेखीखाली लहान मुलांचे हृदयाचे आजार त्यांचे निदान व उपचार तसेच लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया नियमित पणे केल्या जात आहेत. लहान बाळांची काळजी घेणारे प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीने अशा अत्याधुनिक तंत्राचा अवलंबकरून अनेक गुंतागुंतीच्या यशस्वी केसेस हाताळण्यात आल्या आहेत.या मुळे बाळाच्या हृदयविकार व हृदयाच्या शस्त्रक्रिया आपण नाशिक मध्येच करू शकतो. त्यासाठी मुंबई पुणे यासारख्या महानगरात जाण्याची गरज आता भासणार नाही अशी माहिती डॉ सुशील पारख यांनी दिली.

शस्त्रक्रियेनंतर केवळ दुसऱ्या दिवशीच बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. या यशस्वी उपचारामध्ये बाल हृदय विकार तज्ञ डॉ संतोष वाडीले, हृदय विकार तज्ञ डॉ. कांचन भंबारे, बालरोगतज्ञ डॉ नेहा मुखी, भूलतज्ज्ञ डॉ संदीप भंगाळे , लहान मुलांचा अतिदक्षता आणि कॅथ लॅब स्टाफ यांच्या सहकार्याने यशस्वी रित्या पार पाडली.ही घटना अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या रुग्णसेवा आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या प्रती दिलेल्या कटिबद्धतेचे उदाहरण आहे. एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व निदानात्मक सुविधांची उपलब्धता, ह्या सर्व सुविधांमुळे हे यश मिळेल आहे. बाळाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे, सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी विशेष प्रयत्न करून सवलतीच्या दरात ही शस्त्रक्रिया पार पाडली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.