Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

Oct 26, 2024

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यालयातील तब्बल 400 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आकाश कंदील बनवले आहे. भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवाळी या सणानिमित्त प्राचार्य. मनी चावला यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये उपजत असणारे कौशल्य विकसित व्हावे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. या हेतूने शाळेत आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून आकर्षक व पर्यावरण पूरक असे आकाश कंदील विद्यार्थ्यांनी तयार केले. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थी अतिशय उत्साहात कार्यशाळेत सहभागी झाले होते. त्यामुळे शाळेत मुलांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून माफक खर्चामध्ये व कमी वेळेत सुंदर व आकर्षक आकाश कंदील तयार केले असून विद्यार्थ्यांनी तयार केलेला आकाश कंदील विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या घरावर तसेच आपला क्लास रूम दिवाळीच्या सणासाठी लावून सुशोभित करता येणार आहे. कार्यशाळेसाठी शाळेतील चित्रकला शिक्षक श्री निलेश पाटील प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल, रिखबकाका कासलीवाल, जिगोलकिशोर अग्रवाल, महेंद्र भाऊ चांदीवाल, तसेच प्राचार्य मनी चावला, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]