loader image

समीर भुजबळ यांचा अर्ज दाखल

Oct 29, 2024

नांदगांव : माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आहेत.ते नाशिक मधून लोकसभेला संसदेवर निवडून गेले होते आणि त्यांचे चुलते छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील प्रस्थापित नेते आहेत. भुजबळ कुटुंबाची नाशिक जिल्ह्यातील राजकारणात लक्षणीय पकड आहे.

समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि नांदगाव मतदारसंघाच्या विकासाबाबत आपली बांधिलकी व्यक्त केली. त्यांनी आपल्या प्रचारात स्थानिक विकासकामे, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर भर देण्याची घोषणा केली आहे.
भुजबळ यांची अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भयमुक्त नांदगांव प्रगत नांदगांव या मुद्दयावर माजी खा.समिर भुजबळ यांची नांदगांव विधानसभेला अपक्ष नामांकन पञ दाखल समिर भुजबळ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भव्यरँलिच्या माध्यमातून भव्यसभेचे आयोजन करुन मतदाराना मार्गदर्शन करुन नंतर अर्ज दाखल केला यावेळी शहरातील सर्वच मुख्यमार्गावर नागरिकाची गर्दी झाली होती या प्रसंगी सकाळी ११ ते दुपार ३ वाजे पर्यंत नांदगांव शहरात रहदारीची समस्या निर्माण झाली होती पो नि प्रितम चौधरी यांनी लक्ष घालीत रहदारी सुरळीत केली. या वेळी जैनधर्मशाळा येथे सभेचे आयोजन कररून उपस्थित मतदाराना मार्ग दर्शन करण्यात आले यावेळी कळवाडी,निमगांव, साकोरा,बोलठाण, जातेगांव मनमाड नांदगांव, भालुर ,मांडवड, गट गणातील नागरीक उपस्थित होते यावेळी आरपीआय व विविध समनघटना यांनी पाठिबा, जाहिर केला.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.