loader image

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

Nov 26, 2024


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाला शाळेची प्राचार्य मुकेश मिसर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इ. दहावी व इ.पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केले होते या विद्यार्थ्यांना सौ.प्रतिभा पवार श्री सिद्धार्थ पगारे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवी खतिजा शेख. साई चौधरी .तनिष परदेशी.संस्कृती पाटील इयत्ता दहावीची समृद्धी पद्मने. निधी घोडके .या विद्यार्थ्यांनी संविधान दिनाबद्दल आपले विचार मांडले “दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायविरुद्ध प्रकाश होऊन गेले होते ते एक गरीब पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले .अरे या मूर्खांना अजून कळत कसं नाही. ज्यांनी वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा शिक्षण घेतले. त्यांनीच संविधान लिहिले .तुमच्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यास पुस्तके दिले जात नव्हते. त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले. की त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो ते म्हणजे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस कारण याच दिवशी समाजातील तिच्या विळख्यात अडकलेला होता. अज्ञानाचा अंधकारात खितपत पडलेला होता. गुलामगिरीच्या बंधनात जखडलेला होता. तो समाज अस्पृश्य म्हणून हिणवला जात होता. त्या समाजातील एक अस्पृश्य व्यक्ती भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला. 2 वर्ष 11महिने 18 दिवस रक्ताच पाणी करून रात्रीचा दिवस करून भारतीय राज्यघटना लिहून त्यांनी आपल्या भारत देशाला स्वाधीन केली. “तळपत राहून सूर्यासारखा अविरत झिजला चंदनासमान देण्या आम्हा नवंजीवन बनवल माणूस शिकवली मानवता आणि झाला विराजमान प्रत्येकाच्या हृदयात जो बनला आपल्या त्यागान अनाथांचा नाथ क्रांतिवीर युगपुरुष स्त्रीजातीचा उद्धारकर्ता यांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिले. संविधानाने मतदानाचा स्त्री-पुरुष समानतेचा आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला. भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे संविधान आहे 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय राज्यघटना तयार करण्यात आले. आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू करण्यात आली. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला .मुंबई 26/11 सर्व शहीद झालेल्या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कृष्णा पाटील यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.