Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात “शांतता…… पुणेकर वाचत आहेत” कार्यक्रमाचे आयोजन

Dec 12, 2024

 

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे ग्रंथालय व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “शांतता… पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाचन आणि शैक्षणिक संस्कृतीला बळकटी करण्यासोबत जगात पुण्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक १४ डिसेंबर ते 22 डिसेंबर या दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी जनजागृती म्हणून आजचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे असे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ आर एस लोखंडे, यांनी विशद केले. या उपक्रमात दिलेल्या वेळेत ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी उपलब्ध असलेले किंवा आपल्या आवडीचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र क्यूआर कोड च्या माध्यमातून अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी या उपक्रमा संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. देविदास सोनवणे, प्रा. डॉ. पी जी आंबेकर, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने सर्व मशिदिंमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे : फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज शेख यांची मागणी

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने सर्व मशिदिंमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे : फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज शेख यांची मागणी

मनमाड: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून लहान लहान मुलांपासून तर अनेक वयोवृद्ध...

read more
पंचवटी एक्सप्रेस व गोदावरी एक्सप्रेस नांदगाव वरून सोडव्या ; शिवसंस्कार बहु उद्देशीय संस्थेचे भारती पवार यांना निवेदन

पंचवटी एक्सप्रेस व गोदावरी एक्सप्रेस नांदगाव वरून सोडव्या ; शिवसंस्कार बहु उद्देशीय संस्थेचे भारती पवार यांना निवेदन

मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस व मनमाड छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या...

read more
गोदावरीच्या वेळेवर उन्हाळी विशेष गाडी सुरू; चाकरमाने आणि प्रवाशांमध्ये मात्र रेल्वे प्रशासनाने दिशाभूल केल्याचा आरोप

गोदावरीच्या वेळेवर उन्हाळी विशेष गाडी सुरू; चाकरमाने आणि प्रवाशांमध्ये मात्र रेल्वे प्रशासनाने दिशाभूल केल्याचा आरोप

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे देशभरातील ४०० रेल्वे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “भिमोत्सव 22″ला आज पासुन सुरवात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “भिमोत्सव 22″ला आज पासुन सुरवात

मनमाड : महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भिमोत्सव 22"ला...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले जयंती साजरी

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले जयंती साजरी

म. गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]