loader image

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

Dec 26, 2024


मनमाड – नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी, जनश्रद्धा, लोकसत्ताचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी निलेश वाघ, कार्याध्यक्षपदी पत्रीसरकारचे कार्यकारी संपादक उपाली परदेशी, कोषाध्यक्षपदी दै दिनकरचे प्रतिनिधी सोमनाथ घोंगाणे, संघटकपदी लोकमत डिजिटलचे प्रतिनिधी अशोक बिदरी यांच्यासह १३ जणांच्या कार्यकारिणीची लोकशाही मार्गाने निवडणूकीची प्रक्रिया पार पाडून बिनविरोध निवड झाली.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी जनश्रद्धाचे संपादक, लोकसत्ता, सामनाचे प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, दै सकाळचे प्रतिनिधी अमोल खरे, पत्रीसरकारचे संपादक जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, वेगवान मराठीचे प्रतिनिधी मारुती जगधने, गणतंत्र न्यूजचे संपादक प्रा. सुरेश नारायने सर, जनश्रद्धाचे प्रतिनिधी सतीश शेकदार, मराठी मेट्रोचे प्रतिनिधी अनिल निरभवणे हे उपस्थित होते. नांदगावच्या घोंगाणे यांच्या कार्यालयात वार्षीक सर्वसाधारण सभा झाली. उपाली परदेशी यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक करत सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील निधन झालेल्‍या व्‍यक्‍तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्‍यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यात आले. संस्‍थेच्या सन २०२४-२५ च्या लेखापरीक्षणास मंजुरी देण्यात आली. अमोल खरे व प्रा. सुरेश नारायने यांनी पत्रकार संघाच्या नव्‍या कार्यकारिणीच्या निवडीचा प्रस्‍ताव मांडला. अध्यक्ष अमोल खरे यांनी सुरुवातीला पत्रकार संघाचा २ वर्षातील आढावा घेवून केलेल्‍या कार्याची माहिती दिली. ते म्‍हणाले पत्रकार संघाच्या माध्यमातून जे काम करतील त्‍यांनाच पदाधिकारी म्‍हणून यापुढेही संधी मिळेल. सर्वांना सोबत घेत भविष्यातही संघटनेचे कार्य करत राहू. तालुक्यातील पत्रकार संघटनेचे आणि आता विभागीय सचिव म्हणून काम करत असताना पत्रकारांसाठी काम करण्याचा अभिमान आहे. तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून जे काम उभे केले आहे ते जिल्‍ह्यासमोर आहे. पत्रकारांच्या हितासाठी भविष्यातही चांगले निर्णय घेवू. निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाल्यानंतर १३ पत्रकार सदस्यांनी अर्ज विकत घेतल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दै दिव्य मराठीचे बागलाण तालुका प्रतिनिधी रमेश देसले, निवडणूक निरीक्षक दै सकाळचे अंबासन प्रतिनिधी दीपक खैरनार यांनी तालुका पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर केली. उपस्‍थित सभासदांनी या संपूर्ण कार्यकारिणीला टाळ्यांच्या गजरात मान्‍यता दिली. तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांच्या निवडीमध्ये विरोध नसल्‍याने बिनविरोध निवड झाली. नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष म्हणून संदीप जेजुरकर (एबीपीमाझा पुण्यनगरी, जनश्रद्धा, लोकसत्ताचे प्रतिनिधी), उपाध्यक्ष नरहरी उंबरे (दै पुण्यनगरीचे प्रतिनिधी), जगननाना पाटील (दै देशदूत, दै पुण्यनगरीचे प्रतिनिधी), सरचिटणीस निलेश वाघ (एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी) कार्याध्यक्ष उपाली परदेशी (पत्रीसरकार कार्यकारी संपादक), संघटक अशोक बिदरी (लोकमत डिजिटल प्रतिनिधी), कोषाध्यक्ष सोमनाथ घोंगाणे (दै दिनकर प्रतिनिधी), सह-कोषाध्यक्ष रुपाली केदारे (दक्ष न्यूज प्रतिनिधी), प्रसिद्धी प्रमुख तुषार गोयल (मनमाड ठिणगी संपादक), सह- कार्याध्यक्ष राजू लहिरे (लोकनामा, पत्रीसरकार प्रतिनिधी), सह – संघटक निलेश्वर पाटील (प्रेस फोटोग्राफर), सह – सरचिटणीस प्रमित आहेर (दै दिव्य मराठी प्रतिनिधी), संपर्क प्रमुख सोमनाथ तळेकर ( दै पुढारी प्रतिनिधी) यांची नावे जाहीर केली. ६ जानेवारीचा पत्रकार दिन विधायक कार्याने साजरा केला जाणार आहे. पत्रकार संघाच्या नव्‍या कार्यकारिणीने पत्रकारांच्या हिताचे उपक्रम राबवावेत. त्‍याला आमचे सहकार्य असेल असे सर्वांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. नुतन तालुकाध्यक्ष संदीप जेजुरकर म्‍हणाले संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांनी तालुक्यात संघटनेचे जे कार्य केले अगदी तसेच कार्य भविष्यात राबविले जाईल. सर्वांना सोबत घेवून काम करु. आगामी काळात पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवू. सर्व सभासदांनी नव्‍या कार्यकारिणीच्या निवडीचे स्‍वागत केले. यावेळी मुजमिल इनामदार (उपसंपादक, दिव्य मराठी), पंकज वाले दै सकाळ, जाहिरात मॅनेजर), बापू मार्कंड (पत्रीसरकार प्रतिनिधी), रामदास सोनवणे (संपादक ग्रामवार्तापत्र), गणेश केदारे (दै प्रहार प्रतिनिधी), योगेश म्हस्के (छायावृत, प्रेस फोटोग्राफार), सॅमसन आव्हाड (संपादक लोकवजीर), सुशांत राजगिरे (दै जनश्रद्धा प्रतिनिधी), विनायक कदम (दै जनश्रद्धा प्रतिनिधी) यांच्यासह सभासद बहुसंख्येने उपस्‍थित होते. पत्रकार संघाच्या नव्‍या कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्‍त एस.एम.देशमुख, विश्वस्‍त किरण नाईक, विभागीय सचिव अमोल खरे यासंह वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

फोटो
नांदगाव : नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणीसह सर्व सदस्य …


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.