loader image

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

Dec 29, 2024


२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया साठी सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करा ➖ नितीन पांडे
भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा उत्तर चे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ व जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाने दिनांक २८/१२/२०२४दुपारी ३:००वाजता येवला येथील सिद्धार्थ लॉन्स मनमाड रोड या ठिकाणी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेचे प्रमुख वक्ते भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व येवला शहर मंडल चे प्रभारी नितीन पांडे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोबाईल द्वारे आधुनिक पद्धतीने सदस्य नोंदणी बाबत अभ्यास पूर्ण सखोल असे मार्गदर्शन केले भाजपा पदाधिकारी यांनी प्रत्येक बूथ मध्ये किमान 200 प्राथमिक सदस्य करावे तसेच भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, व्यापारी आघाडी अनुसूचित मोर्चा च्या पदाधिकारी यांनी देखील सदस्य नोंदणी अभियानात सक्रीय सहभागी व्हावे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकी यश मिळवण्यासाठी हे सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करावे असे आवाहन यावेळी नितीन पांडे यांनी केले या सदस्य नोंदणी कार्यशाळा कार्यक्रमाचे येवला मंडल अध्यक्ष मिननाथ पवार सरचिटणीस युवराज भाऊ पाटोळे चेतन धसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले सरचिटणीस गणेश भाऊ खळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमास भाजपा नाशिक जिल्हा उत्तर केमिस्ट आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज जी दाणेज येवला शहर मंडल उपाध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी बडा अण्णा शिंदे संतोष भाऊ नागपुरे मच्छिंद्र भाऊ पवार सागर भाऊ नाईकवाडे अमोल भाऊ पांगुळ शहर चिटणीस धनंजय भाऊ नागपुरे मनोज भाऊ भावसार चेतन पुंड शहर चिटणीस अमोल शिंदे संकेत जाधव शहर मंडल कामगार आघाडीचे अध्यक्ष अशोक भाऊ गुजर विनकर आघाडीचे अध्यक्ष निलेश भाऊ परदेशी भाजपा उत्तर ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष रत्नाताई गवळी जिल्हा चिटणीस मनीषा ताई चव्हाण मनिषा ताई कुलकर्णी अनुराधाताई भायबंग ज्योतीताई कपुरे येवला शहर मंडल भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष अशोक भाऊ शिंदे येवला शहर वकील आघाडीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राधेश्याम भाऊ परदेशी येवला शहर मंडल अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अकिल भाई शाह येवला शहर दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष अमित भाऊ भावसार जालिंदर पवार शुभम गुंजाळ चेतन बेलदार राजू भाऊ शिंदे चंद्रकांत शिंदे पप्पू शिंदे सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यशाळे चे संयोजन भाजपा येवला शहर अध्यक्ष मिननाथ पवार व कार्यकारिणी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.