loader image

मनमाड महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा

Jan 9, 2025


 

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे पत्रकार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात आलेल्या सर्व पत्रकारांचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी स्वागत केले. पत्रकार दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात श्री सतीश शेकदार, व श्री नरेशभाई गुजराती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. अरूण पाटील यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांची समाजातील महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. तसेच जीवनातील स्वतःचा अनुभव सांगताना वर्तमानपत्र वाचनामुळे व्यक्तिमत्व विकासात अमुलाग्र बदल झाला असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी श्री अमोल खरे, श्री नरेश गुजराती, श्री नरहरी उंबरे, श्री उपाली परदेशी, श्री अजहर शेख, सौ रुपाली केदारे व श्री रईस शेख श्री अमीन शेख हे पत्रकार उपस्थित होते.
यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बी एस देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सुभाष अहिरे, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, कार्यालयीन अधीक्षक श्री चंद्रशेखर दाणी अकाउंटंट श्री प्रशांत सानप उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. शरद वाघ सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख पी. व्ही. अहिरे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.