भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित
अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करीत ४५ किलो वजनी गटात ६९ किलो स्न्याच ८० किलो क्लीन जर्क १४९ किलो वजन उचलून यूथ व जूनियर या दोन्ही वयोगटात दोन सुवर्ण पदके पटकावत उत्तम कामगिरी बजावली
अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स लीग चे आयोजन महात्मा गांधी स्टेडियम ब्रह्मपुर ओडिशा येथे ८ ते १४ जानेवारी २०२५ दरम्यान करण्यात आले आहे
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर भारतीय क्रीडा प्राधिकरण चे विजय रोहीला यांच मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस वाघदर्डी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष भराडे महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

नांदगाव शहरात लवकरच फुले दांपत्याचा पूर्णाकृती पुतळा उभारणार – आमदार कांदे
नांदगाव: क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त आमदार सुहास (आण्णा) कांदे व...