Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मकर संक्रांत निमित्त फलक रेखाटनातून सामाजिक संदेश

Jan 13, 2025

दि.१४ जानेवारी २०२५.
मकर संक्रांत
या सणाला पतंग उत्सव साजरा करण्याची खूप जुनी परंपरा आहे.लहान असो वा मोठे सर्व रंगीबेरंगी पतंग उडवून हा सण उत्साहात साजरा करतात. पण हा खेळ आता जीवघेणा ठरत आहे. पूर्वी साधा सुती दोरा वापरून पतंग उडवीत असत पण आता सर्रास नायलॉन व चिनी मांजा वापरला जातो. हाच मांजा पशु पक्षी व मानवाला जीवघेणा ठरतोय.
उत्साहाच्या सणात या मांजामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक पशु-पक्षी ,लहान मुलं, व माणसांना ईजा झाली. मकर संक्रांत सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी पतंग उडवताना सुती दोरा वापरावा,अधिक उंच व धोक्याच्या ठिकाणाहून पतंग उडवू नये. नायलॉन व चिनी मांजा चा वापर टाळावा व दुचाकी वरून जातांना हेल्मेट सह गळ्याला रुमाल किंवा स्कार्प गुंडाळावा.
वरील शालेय दर्शनी फलक रेखाटनातून हाच समाजोपयोगी संदेश देण्यात आला आहे.
फलक रेखाटन- देव हिरे.
(शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

  मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल...

read more
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]