loader image

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Jan 21, 2025


पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित डॉक्टर श्री. डॉ. धीरज बरदिया , डॉ. अनिल सोनार , डॉ. श्री. सुरेंद्र गुजराथी , डॉ. भूषण शर्मा यांच्या उपस्थितीत शाळेतील तब्बल ४०० विद्यार्थी आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी आरोग्य तपासणी व दंत तपासणी करण्यात आली . ह्या मध्ये बालवाडी पासून ते दहावी पर्यंत सर्वच विद्यार्थी यांची तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले .
ह्याच शिबिरात सध्या सुरू असलेल्या ( HMPV ) वायरस पासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये ह्या संबंधी माहिती देवून जागरूक केले .
शहरातील मुख्य चौकात ( HMPV ) संबंधी माहिती दर्शविणारे डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले . शाळेच्या दर्शनी भागात पण जन जागृती व्हावी यासाठी पत्रक लावण्यात आले .
ह्या निमित्ताने क्लब चे अध्यक्ष श्री. कौशल शर्मा यांनी आरोग्य तपासणी वेळेवर करणे गरजेचे का आहे याचे महत्त्व सांगितले . तसेच एच एम पी व्ही व्हायरस बद्दल जागरूक राहावे असे आवाहन केले .
ह्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य श्री अरुण कुमार यांनी रोटरी क्लब ऑफ मनमाड ला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल धन्यवाद दिले .
ह्याच शिबिरात क्लब च्या वतीने ( HMPV ) व्हायरस चे जन जागृती अभियान सुरू केले . ह्या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण कुमार यांनी क्लब चे विशेष कौतक केले . कोविड-19 नंतर अश्या प्रकारचे संसर्ग जन्य आजाराचा आपण प्रसार थांबवू शकतो म्हणूनच ह्याची जन जागृती होणे गरजेचे आहे असे मत श्री. अरुण कुमार यांनी व्यक्त केले .
ह्या निमित्ताने रोटरी क्लब चे सेक्रेटरी श्री. डॉ. भूषण शर्मा, डॉ सुरेंद्र गुजराथी, डॉ अनिल सोनार, डॉ धीरज बरडिया , क्लब चे ज्येष्ठ सदस्य श्री. गुरजीत सिंह कांत, श्री अनिलदादा काकडे, श्री स्वप्निल सूर्यवंशी व प्रकल्प अध्यक्ष श्री आनंद काकडे उपस्थित होते .
उपक्रम यशस्वितेसाठी क्लब चे सर्व सदस्य , डॉक्टर्स , विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.