मनमाड : इयत्ता १o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 1376 एच.ए.के.हायस्कूल, मनमाड या केंद्रात १) एच.ए.के हायस्कूल,मनमाड – परीक्षा बैठक क्रमांक D064269 ते DO64645
२) मध्ये रेल्वे माध्यमिक विद्यालय, मनमाड – परीक्षा बैठक क्रमांक D064267 ते DO64643.
3) गुरु गोविंदसिंग इंग्लिश स्कूल, मनमाड परीक्षा बैठक क्र. D064492 ते DO64542.
४) इकरा गर्ल्स उर्दू हायस्कूल, मनमाड- परीक्षा बैठक क्रमांक D064545 ते D064635
असे या केंद्रात एकूण 382 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे.
दि.20-2-2025 गुरुवार रोजी या केंद्रात दोन सत्रात इ.12 वी प्रमाणपत्र परीक्षा असल्यामुळे संबंधीत विद्यार्थी व पालकांना दिनांक 19/02/2025 बुधवार रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 या वेळेत एच.ए.के. हायस्कूल,मनमाड येथे आसनव्यवस्था पाहता येणार आहे.सदर परीक्षेत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत पहिल्या दिवशी दिनांक 21/02/2025 शुक्रवार रोजी सकाळी १०:०० वाजता परीक्षा दालनात हजर रहावे. सकाळी १०:३० वाजेनंतर उशिरा येणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेस येतांना सोबत फक्त स्वतःचे परीक्षा प्रवेशपत्र, शालेय ओळखपत्र किंवा आधार कार्ड, व लेखन साहित्य आणावे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वही, पुस्तक किंवा परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या हेतुने कोणतेही साहित्य आणु नये. मंडळ परिपत्रकानुसार कॉपीमुक्त अभियान अंमलबजावणी केली जाईल. अशा सुचना केंद्र क्रमांक 1376 चे केंद्र संचालक यांनी केलेल्या आहे.