मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही किल्ले बांधणी स्पर्धा नक्कीच महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले.
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शालेय पातळीवर गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन पोलीस परेड ग्राउंड वर करण्यात आले होते या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना विजय करे यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गडकिल्ल्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मनमाड न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती क्रांती मोरे यांनी देखील विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधताना अशा उपक्रमांची आज गरज असल्याचे आवर्जून प्रतिपादन केले आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग द्यावा असे आवाहन केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांनी प्रास्ताविक केले. मनमाडमध्ये प्रथमच असा उपक्रम पत्रकार संघाच्या पुढाकारातून राबवण्यात आला सकाळी आठ वाजेपासून ते साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल साडेतीन तास शेकडो हात किल्ले बनवण्यात गुंतलेले होते माती पाणी दगड विटा यांच्या साथीने छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहासाची आठवण मनात ठेवत विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने आणि भव्य प्रमाणात हुबेहूब किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या एक दोन नव्हे तर तब्बल ३२ किल्ले विद्यार्थ्यांनी साकारल्याने अवघ्या मनमाड शहरात या स्पर्धेची एकच चर्चा होत आहे विशेष म्हणजे मनमाड शहरातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेला आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे प्रशंसा केली त्यातही विशेष आज म्हणजे मनमाड शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी महिला व माता-भगिनींनी आणि मुला शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट दिल्याने एक वेगळे सांस्कृतिक आणि वातावरण तयार झाल्याचे दिसून आले . मनमाड शहर पोलीस दलाने या स्पर्धेसाठी सकारात्मक आणि भरघोस असे सहकार्य दिले. या स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या संघाला प्रथम क्रमांक के आर टी हायस्कूलच्या संघाला द्वितीय क्रमांक छत्रे हायस्कूलच्या संघाला तृतीय क्रमांक सरस्वती विद्यालयाच्या संघाला चतुर्थ क्रमांक आणि केंद्रीय विद्यालयाच्या संघाला पाचवा क्रमांक मिळाला विजेत्यांना स्मृतीचिन्ह रोग बक्षीसे व प्रमाणपत्रे देण्यात आली सर्व सहभागी विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्र देण्यात आली पारितोषिक वितरण प्रसंगी मंचावर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे, तालुकाध्यक्ष संदीप जेजुरकर सरचिटणीस निलेश वाघ यांचेसह ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरेश गुजराती, जहुर खान, सतीश शेकदार, नरहरी उंबरे, प्रायोजक संजय कटारे अमर चव्हाण, प्रकाश पठाडे, राकेश कोल्हे, नरेंद्र संसारे, समाधान सुखदेवे, विक्रम सुरवसे, पंकज सुरडे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे यांची उपस्थिती होती. कलाशिक्षक काशिनाथ अहिरे, विनोद जांभोरे आणि श्री गांगुर्डे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. प्रकल्प संयोजक मिलिंद वाघ यांच्या संयोजनाखाली पत्रकार संघाचे अशोक बिदरी, गणेश केदारे, राजेंद्र धिंगाण,आनंद बोथरा, तुषार गोयल,योगेश म्हस्के, विशाल मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ श्री भिंगारदे पोलीस उपनिरीक्षक श्री धुमाळ पोलीस हवालदार पी के सानप राजेंद्र केदारे पंकज देवकाते पोलीस नाईक संदीप झाल्टे महिला पोलीस हवालदार दिपाली आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल रणजीत चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र खैरनार पोलीस कॉन्स्टेबल गौरव गांगुर्डे यांनी आयोजनात सहकार्य दिले. पत्रकार संघाच्या सह कोषाध्यक्ष सौ रुपाली केदारे स्वाती गुजराती आम्रपाली वाघ प्रिया निकुंभ परदेशी नैवेद्य बिदरी यांच्या हस्ते श्रीमती क्रांती मोरे यांचा सत्कार करण्यात आला.उपाली परदेशी यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.