मनमाड येथील छत्रे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक व पत्रकार संदीप देशपांडे यांच्या ” तू चाल पुढं ” या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राच्या राजधानीत दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होत आहे . हे पुस्तक सिद्धी प्रकाशनने प्रकाशित केले असून लेखक व समीक्षक डॉ विनोद सिनकर यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे . साहित्य संमेलनात मान्यवरांचे पुस्तक प्रकाशन होत असून त्यात संदीप देशपांडे यांचा समावेश आहे .गावातल्या पाणी टंचाईची झळ मोठ्यांबरोबरच शाळेतील मुलांना बसते . त्यातून ते आपापल्या परीने पाणी टंचाई दूर करण्यासाठी विविध युक्त्या प्रयुक्त्या करतात .लहान मुलांनी एकत्र येऊन पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ही गोष्ट आहे . संदीप देशपांडे यांचे हे अकरावे पुस्तक असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .21 ते 23 दरम्यान दिल्लीत पुस्तक प्रकाशित होणार असल्याचे प्रकाशन समिती अध्यक्ष घनश्याम पाटील यांनी कळविले आहे.

राशी भविष्य : ९ जून २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....